Shreya Dewalkar
विक्रम लॅंडरची स्थिती तपासून लवकरच प्रज्ञान बग्गी त्यातून बाहेर येईल.
त्यासाठी एक दिवसाचा कालावधी सुद्धा लागू शकतो.
विक्रम लॅंडरवरील उपकरणे सुरवातीला कार्यान्वित होतील.
ज्यातील ''रंभा एलपी'' नावाचे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील आयन्स आणि इलेक्ट्रॉन्सचे मापण करेल.
थर्मो फिजिकल उपकरण दक्षिण ध्रुवावरील तापमानातील बदल अभ्यासेल.
तसेच चंद्रावरील भूकंपाचे मापन करणारे उपकरणही याच काळात कार्यान्वित होईल.
प्रज्ञान बग्गीमधील एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर चंद्राच्या मातीची रासायनिक अवस्था स्पष्ट करेल तर लेझर स्पेक्ट्रोमीटर चंद्राच्या मातीतील खनिजांची माहिती देईल.