Akshata Chhatre
सध्याच्या काळात कॉफी केवळ एक पेय राहिलेली नसून, ती एक “लाइफस्टाइल ड्रिंक” बनली आहे.
सकाळच्या ताजेपणापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत किंवा मित्र-मैत्रिणींसोबतच्या गप्पांपर्यंत कॉफीचा वापर केला जातो.
पण कॉफी खरोखरच आपल्या आरोग्यासाठी फायद्याची आहे की तिचे जास्त सेवन नुकसानकारक ठरू शकते?
कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचे काही दुष्परिणामहोऊ शकतात. त्यात असलेल्या कॅफीनच्या अतिरेकामुळे हृदयाचे ठोके वेगाने धडधडतात, रक्तदाब वाढतो आणि चिंता वाढू शकते.
संध्याकाळी ४ वाजल्यानंतर कॉफीचे सेवन केल्यास ती झोपेवर परिणाम करते. तिच्यातील कॅफीन शरीरात बराच काळ सक्रिय राहते, ज्यामुळे झोप लवकर लागत नाही किंवा झोपेची गुणवत्ता बिघडते.
कॉफीचा योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास ती आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सर्व प्रकारच्या कॉफीपैकी ब्लॅक कॉफी सर्वात उत्तम मानली जाते.
कॉफी पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नाही. तुम्ही ती कशी बनवता, किती प्रमाणात घेता आणि कोणत्या वेळी घेता यावर तिचे परिणाम अवलंबून असतात.