Akshay Nirmale
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा घटस्फोट चर्चेचा ठरला होता. या घटस्फोटानंतर अभिनेत्री सोभिता धुलिपला ट्रोल झाली होती.
ट्रोल्सनी सोभिताला नागा-समंथाचा संसार मोडणारी असेही म्हटले होते.
नागा-समंथाच्या घटस्फोटानंतर सोभिता आणि नागा अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते.
सोभिता-नागा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
सोभिताला नागाशी रिलेशनशिपबाबच विचारले असता, जे लोक काहीही माहिती न घेता बोलतात, त्यांच्याविषयी बोलणार नाही, असे सोभिता म्हणाली.
जर मी काही चुकीचे करत नसेन, तर मला कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असेही सोभिता म्हणाली.
दरम्यान, नागा किंवा सोभिता यांनी त्यांच्या रिलेशनशिपबाबत कुठेही, काहीही वक्तव्य आत्तापर्यंत केलेले नाही.