दैनिक गोमन्तक
ख्रिसमस ट्रीविषयी खूप इंट्रेस्टींग काही गोष्ट आपण पाहूयात.
असे म्हणतात की, ख्रिसमस ट्री सजवण्यास जर्मनीमध्ये सुरुवात झाली.
एकदा जर्मनीच्या सेंट बोनिफेसला समजले की काही लोकं ओक वृक्षाजवळ एका लहान मुलाचा बळी देणार आहेत.
त्या मुलाला वाचवण्यासाठी सेंट बोनिफेसने ओक वृक्ष कापून टाकला.
काही दिवसांनी त्याच ठिकाणी 'सनोबर'चे झाड उगवले.
लोकांना हा मोठा चमत्कार वाटला. सेंट बोनिफेसने लोकांना हे झाड पवित्र, दैवी असल्याचे सांगितले.
तेव्हापासून जीससचा जन्मदिवस असतो तेव्हा हे झाड सजवले जाते.
या पवित्र झाडाला त्यामुळे 'ख्रिसमस ट्री' म्हणले जाते.