गोमन्तक डिजिटल टीम
पावसाळ्यात वातावरणातील ओलावा, सगळीकडे चिखल आशा गोष्टींमुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
पावसाळ्यात एक मुख्य समस्या सतावते ती म्हणजे पाण्यामुळे आपल्या चपला, बूट सतत ओले राहण्याची. बूट एकदा का भिजले तर ते सहजासहजी सुकत नाहीत. यामुळे बूटांचा आलेला वासही जात नाही.
आपण काही सोपे घरगुती उपाय वापरुन चपला, बुटातून येणारी दुर्गंधी नाहीशी करु शकतो
लिंबाची साल
बुटामध्ये रात्रभर लिंबाची किंवा संत्र्याच्या साल ठेवावी. संत्रे किंवा लिंबू यांसारख्या फळांच्या फ्रेश वासामुळे चपलांमधील दुर्गंध कमी होण्यास मदत होते.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा मॉइश्चर वेगाने शोषून घेतो. त्याचसोबत तो दुर्गंध कमी करण्यासही मदत करतो. चपला, बूट ओले असतील तर त्यात थोडा बेकिंग सोडा शिंपडा व रात्रभर तसाच ठेवून द्यावा.
चपला, बुटांमधून दुर्गंधी किंवा कुबट वास येत असेल व ते ओले असतील तर कोरडे करण्यासाठी त्यात कागदाचे तुकडे पसरवून ठेवा. त्यामुळे चपला, बुटातील ओलावा शोषला जाईल आणि दुर्गंधही कमी होईल.
दुर्गंध काढण्यासाठी त्यात टॅल्कम पावडर रात्रभर शिंपडून ठेवा. त्यामुळे दुर्गंध कमी होईल.