टीम इंडियाने झळकावली कसोटीतील सर्वात 'फास्ट सेंच्युरी'

Pranali Kodre

दुसरा सामना

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे खेळवण्यात आला.

Team India | Twitter

मालिका विजय

हा सामना पाचव्या दिवशी अनिर्णित राहिला. त्यामुळे मालिका भारताने 1-0 अशी जिंकली. दरम्यान, दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला.

Yashasvi Jaiswal - R Ashwin | Twitter

डाव घोषित

त्रिनिदाद कसोटीत भारताने दुसरा डाव 24 षटकात 2 बाद 181 धावा करत घोषित केला होता.

Rohit Sharma - Yashasvi Jaiswal | Twitter

74 चेंडूत 100 धावा

या डावात भारताने 74 चेंडूतच 100 धावांचा आकडा पार केला होता.

Rohit Sharma - Yashasvi Jaiswal | Twitter

विश्वविक्रम

त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद डावात 100 धावा करण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर झाला.

Virat Kohli - Ravindra Jadeja | Twitter

श्रीलंकेचा विक्रम मोडला

यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध 2001 साली 80 चेंडूत 100 धावा केल्या होत्या.

Sri Lanka | Twitter

इंग्लंड

तसेच इंग्लंड संघाने 1994 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत डावाच्या 81 चेंडूत 100 धावांचा टप्पा पार केला होता.

England | Twitter

बांगलादेश, इंग्लंडचाही विक्रम

याशिवाय बांगलादेशने वेस्ट इंडिजविरुद्ध 2012 साली आणि इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 2022 साली झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये डावात प्रत्येकी 82 चेंडूत 100 धावांचा टप्पा पार केलेला.

England | Twitter
Kylian Mbappe | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी