Ashutosh Masgaunde
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात 12 जुलैपासून दोन सामन्यांची कसोटी सामने सुरू होणार आहेत. दोन्ही संघ त्यानंतर तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळणार आहेत.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 98 कसोटी सामने झाले आहे. यामध्ये विंडिज 30 तर भारत 22 सामने जिंकला आहे. यात 46 सामने ड्रॉ झाले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर आहे. कपिल देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 25 कसोटी सामने खेळत 89 बळी घेतले आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा अनिल कुंबळे हा दुसरा गोलंदाज आहे. कुंबळेने 17 सामन्यात 29.78 च्या सरासरीने 74 विकेट घेतल्या आहेत.
श्रीनिवास वेंकटराघवन हे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे तिसरे गोलंदाज आहेत. त्यांनी 23 सामन्यात 39.47 च्या सरासरीने 68 बळी घेतले.
बीएस चंद्रशेखर हे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे चौथे गोलंदाज आहेत. त्यांनी 15 सामन्यात 33.52 च्या सरासरीने 65 बळी घेतले आहेत.
बिशन सिंग बेदी यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 18 कसोटी सामने खेळत 34.88 च्या सरासरीने 62 बळी घेतले आहेत.