HBD Gayle: क्रिकेटमधील 'युनिवर्स बॉस'

Pranali Kodre

वाढदिवस

वेस्ट इंडिजचा दिग्गज सलामीवीर ख्रिस गेलचा जन्म किंगस्टनला 21 सप्टेंबर 2023 रोजी झाला. त्याचे पूर्ण नाव ख्रिस्तोफर हेन्री गेल असे आहे.

Chris Gayle | Twitter

युनिवर्स बॉस

'युनिवर्स बॉस' या टोपन नावाने ओळखला जाणारा गेल टी20 क्रिकेटमधील सुपरस्टार समजला जातो.

Chris Gayle | Twitter

कसोटी क्रिकेट

मात्र, अनेकांना हे माहित नाही की गेलने कारकिर्दीत 103 कसोटी सामने देखील खेळले असून त्यात 333 धावांच्या सर्वोच्च खेळीसह 7214 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने 15 शतके आणि 36 अर्धशतके झळकावली आहेत.

Chris Gayle | Twitter

टी20 वर्ल्डकपमध्ये शतक

साल 2007 च्या पहिल्या वहिल्या टी20 वर्ल्डकपमध्ये पहिल्याच सामन्यात शतक करण्याचा कारनामाही गेलने केला आहे.

Chris Gayle | Twitter

175 धावा

तसेच त्याने आयपीएल 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध तोडफोड 175 धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने टी20 क्रिकेटमधील सर्वात जलद शतक आणि सर्वोच्च खेळीचा विक्रम नावावर केलेला.

Chris Gayle | Twitter

वनडे द्विशतक

गेलच्या नावावर वनडेमध्ये द्विशतकाचीही नोंद असून त्याने 2015 वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावांची खेळी केली होती.

Chris Gayle | Twitter

टी20 क्रिकेट

टी20 क्रिकेटमध्ये त्याने 463 सामन्यांमध्ये 22 शतके आणि 88 अर्धशतकांसह 14562 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1132 चौकार आणि 1056 षटकार मारले आहेत.

Chris Gayle | Twitter

टी20 विक्रम

गेल टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा, सर्वाधिक शतके करणारा आणि सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे.

Chris Gayle | Twitter

वेस्ट इंडिजचा दिग्गज

गेल हा वेस्ट इंडिजकडून वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 प्रकारात सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू आहे.

Chris Gayle | Twitter

वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20

गेलने वनडेत 301 सामने खेळताना 25 शतकांसह 10480 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 79 सामन्यात 2 शतकांसह 1899 धावा केल्या आहेत.

Chris Gayle | Twitter

अष्टपैलू गेल

गेल फक्त सलामीवीर म्हणूनच नाही, तर एक चांगला अष्टपैलू खेळाडूही आहे. त्याने गोलंदाजी करताना कसोटीत 73 विकेट्स, वनडेत 167 विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 20 विकेट्स घेतल्या आहेत.

Chris Gayle | Twitter

वाराणसीत तयार होतंय नवं क्रिकेट स्टेडियम

Cricket Stadium in Varanasi | Twitter
आणखी बघण्यासाठी