Sameer Amunekar
दिवसाची सुरुवात पुरेसं पाणी पिऊन करा. शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि दिवसभर अनावश्यक खाणं टाळण्यासही मदत होऊ शकते.
दररोज नियमित चालणे ही सोपी पण प्रभावी सवय आहे. शक्य असल्यास दिवसभरात जास्त वेळ बसून राहण्याऐवजी मध्येच थोडं चालत राहा.
डाळी, कडधान्ये, अंडी, दही, पनीर, भाज्या, फळं आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा. यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटण्यास मदत होऊ शकते.
कोल्ड ड्रिंक्स, गोड पदार्थ, पॅकेज्ड स्नॅक्स आणि जास्त साखर असलेले पदार्थ रोज खाण्याची सवय टाळा. त्याऐवजी पौष्टिक आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ निवडा.
फिटनेससाठी व्यायामाइतकीच झोपही महत्त्वाची आहे. दररोज पुरेशी आणि नियमित झोप घेण्याचा प्रयत्न करा.
फक्त पोटाचे व्यायाम करण्याऐवजी संपूर्ण शरीराचा व्यायाम करा. स्क्वॅट्स, पुश-अप्स, लंजेस आणि इतर स्ट्रेंथ एक्सरसाइज नियमित केल्याने फिटनेस सुधारण्यास मदत होते.
पोटाची चरबी कमी होण्यासाठी वेळ लागू शकतो. क्रॅश डाएट किंवा अतिव्यायाम करण्याऐवजी संतुलित आहार, नियमित हालचाल, व्यायाम आणि चांगली झोप यावर सातत्याने लक्ष द्या.