Sameer Amunekar
दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्या. जेवणाआधी एक ग्लास कोमट पाणी प्या, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि ओव्हरइटिंग होत नाही.
साखर आणि गोड पदार्थ खाणं मर्यादित ठेवा. साखरेऐवजी मध किंवा खजूर पेस्ट वापरा.
पिझ्झा, बर्गर, चिप्स, कोल्ड्रिंक्स यांना टाळा. घरचं, स्वच्छ आणि हलकं अन्न खावे.
भाज्या, फळं, ओट्स, संपूर्ण गहू यामध्ये फायबर जास्त असतं ते पचन सुधारतं आणि वजन कमी करतं.
दररोज ७–८ तासांची शांत झोप आवश्यक आहे. झोप कमी झाली, की भूक वाढते आणि वजनही.
दिवसातून १-२ वेळा ग्रीन टी प्या. ती मेटॅबॉलिझम वाढवते आणि फॅट बर्निंगला मदत करते.