Sameer Amunekar
वेलची शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. सकाळी कोमट पाण्यात वेलची घेणे मेटाबॉलिझम वाढवते.
वेलचीचे पाणी पचनशक्ती वाढवते आणि गॅस, अॅसिडिटी किंवा पोटदुखीपासून आराम देते.
वेलचीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात, ज्यामुळे त्वचा आणि आरोग्य सुधारते.
वेलचीचे पाणी शरीरातील पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती कमी करते, त्यामुळे फुगवटा कमी होतो.
सकाळी वेलचीचे पाणी पिल्याने शरीरात ताजेतवानेपणा आणि एनर्जी येते. दिवसाची सुरुवात उत्तम होते.
वेलचीचे पाणी तोंडातील बॅक्टेरिया कमी करते, ज्यामुळे दुर्गंध नाहीसा होतो आणि श्वास ताजा राहतो.
वेलचीमधील पोषक घटक रक्तप्रवाह सुधारतात, ज्यामुळे शरीर निरोगी आणि त्वचा अधिक ग्लोइंग दिसते.