दैनिक गोमन्तक
अनेकांना शेपूची भाजी त्याच्या वासामुळे आवडत नाही. मात्र या भाजीचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
पोट दुखणे, पोट फुगणे असे त्रास असतील तर तुम्ही आहारात शेपूच्या भाजीचा समावेश व्हायला हवा.
तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळेल.
रात्री झोप लागत नसेल तर तुम्ही शेपूची भाजी हमखास खायला हवी.
शेपूमध्ये फ्लेवोनाईड्स आणि व्हिटॅमिन B हे घटक असतात जे तुमचे मन आणि मेंदू शांत ठेवण्याचे काम करतात. जर तुमचे मन आणि मेंदू शांत असेल तर तुम्हाला झोपही चांगली लागते.
शेपूमध्ये असलेल्या पोषकतत्वांमुळे तुमचे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.
कॅल्शिअमचा घटक असल्यामुळे शेपूची भाजी ही फारच फायद्याची ठरते.