Kavya Powar
मद्यपान केल्याने वजन नियंत्रणात राहत नाही, हे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे.
अल्कोहोलमध्ये प्रति ग्रॅम सात कॅलरीज असतात, त्या तुलनेत कार्बोहायड्रेट्ससाठी प्रति ग्रॅम चार कॅलरीज आणि चरबीसाठी प्रति ग्रॅम नऊ कॅलरीज असतात.
एका मोठ्या ग्लास व्हाईट वाईनमध्ये आइस्क्रीमच्या सर्व्हिंगइतक्या कॅलरीज असू शकतात.
बिअरच्या एका पिंटमध्ये चॉकलेट बारइतक्या कॅलरीज असू शकतात. त्यामुळे तुम्ही कदाचित नकळत फक्त कॅलरीचे सेवन करत आहात
जे तुमच्या वजनासाठी चांगले नाही.
तुमच्या वजनावर अल्कोहोलमधील विविध घटक प्रभाव टाकू शकतात, ज्यामध्ये तुम्ही काय पिता, किती वेळा मद्यपान करता. यांचा फरक पडतो.
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की अल्कोहोल काही लोकांसाठी लठ्ठपणाचा घटक असू शकतो, विशेषत: मोठ्या प्रमाणात सेवन केल्यावर.