Sameer Amunekar
वीकेंडला अचानक जास्त व्यायाम टाळा
संपूर्ण आठवडाभर व्यायाम न करता शनिवार-रविवारी अचानक हेवी वर्कआउट केल्यास खांद्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
खांद्यांमध्ये दुखण्याचा धोका
क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलल्यास खांद्यांच्या स्नायूंवर आणि टेंडन्सवर ताण येऊ शकतो. त्यामुळे वेदना किंवा दुखापत होण्याची शक्यता वाढते.
वॉर्मअपकडे दुर्लक्ष करू नका
वर्कआउटपूर्वी हलका व्यायाम आणि खांद्यांची हालचाल करणारे वॉर्मअप करा. यामुळे शरीर व्यायामासाठी तयार होण्यास मदत होते.
योग्य वजनाची निवड करा
सुरुवातीलाच जड डंबेल्स उचलण्याऐवजी कमी वजनापासून सुरुवात करा. व्यायाम करताना योग्य तंत्र आणि शरीराची क्षमता यांना प्राधान्य द्या.
आठवडाभर व्यायामात सातत्य ठेवा
फक्त दोन दिवस अतिशय कठीण व्यायाम करण्याऐवजी आठवडाभर नियमित आणि क्षमतेनुसार शारीरिक हालचाल करा. व्यायामाचा भार हळूहळू वाढवा.
शरीराला विश्रांती देणंही महत्त्वाचं
स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी पुरेशी विश्रांती आणि झोप आवश्यक आहे. खांद्यांमध्ये सतत वेदना होत असतील तर त्याच स्नायूंवर पुन्हा जोर देऊ नका.
वेदना जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या
व्यायाम करताना तीव्र वेदना, सूज किंवा हात वर उचलताना त्रास होत असल्यास व्यायाम थांबवा. लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.