Sameer Panditrao
भारतीय हवामान विभाग (IMD) मुसळधार पाऊस, गारपीट, हिमवृष्टी, वीजांचा कडकडाट, धुळीचे वादळ, हिटवेव्ह किंवा थंडीची लाट यांसाठी रंग-कोडेड अलर्ट जारी करतो.
या अलर्टमुळे लोकांना आगाऊ माहिती मिळते व संभाव्य धोका टाळण्यासाठी तयारी करता येते.
सामान्य हवामानस्थिती. दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणेच सुरू ठेवावे.
हवामान गंभीर होऊ शकते, पण मोठा धोका नाही. हलके पूर, वाहतूक किंवा तयारीत अडथळा.
गंभीर हवामानामुळे रेल्वे, हवाई किंवा रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता.
जीवितास व संपत्तीला गंभीर धोका. स्थलांतराची वेळ येऊ शकते. वाहतूक व वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो.
हे रंग-कोड जास्तीत जास्त पाच दिवसांसाठी लागू असतात आणि हवामान घटनेची तीव्रता व परिणाम यावर आधारित असतात.