'समृद्धी अन् शांततेसाठी पाणी'

दैनिक गोमन्तक

'जागतिक जल दिवस'

1992 पासून युनायडेट नेशन्स ( United Nations ) अंतर्गत दरवर्षी 22 मार्चला 'जागतिक जल दिवस' साजरा केला जातो.

Water | Dainik Gomantak

चांगले जीवन

उत्तम आरोग्यासाठी आणि चांगल्या जीवनासाठी ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र निवाऱ्याची गरज असते त्याचप्रमाणे स्वच्छ पाण्याचीदेखील गरज असते.

Water | Dainik Gomantak

पाण्याचा तुटवडा

मान्सूनच्या अनियमितपणामुळे सध्या अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. माणसाच्या दैनंदीन गरजांसाठी पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळे याबाबत जागरुकता निर्माण करणे महत्वाचे आहे.

Water | Dainik Gomantak

स्थलांतर

ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा असतो त्याठिकाणचे नागरिक इतर प्रदेशात स्थलांतर करताना दिसतात. स्थलांतरित झालेल्या ठिकाणचे रहिवासी आणि स्थलांतरित यांच्यामध्ये वाद निर्माण होतात आणि अशांतता निर्माण होते.

Water | Dainik Gomantak

प्राणी

उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पूर्णपणे पाणी आटून जाते, अशावेळी प्राण्यांचेदेखील हाल होताना दिसतात.

Water | Dainik Gomantak

संवर्धन

जर समाजात शांतता कायम ठेवायची असेल आणि प्रगतीकडे वळायचे असेल तर पाणी जपून वापरणे आणि पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे.

Dainik Gomantak

थीम

यामुळे यावर्षी जागतिक जल दिनानिमित्त 'समृद्धी अन् शांततेसाठी पाणी' अशी थीम ठेवण्यात आली आहे.

Dainik Gomantak