Akshata Chhatre
नवीन नात्याची गोडी काही औरच असते. हृदयात नवे स्पंदन, डोळ्यांत नवे स्वप्नं आणि मनात असंख्य प्रश्न!
पण ह्या सुरुवातीच्या टप्प्यावर काही गोष्टींमुळे नातं फुलण्याऐवजी कोमेजण्याचीही शक्यता असते.
तुमची गर्लफ्रेंड करिअरिस्टिक असेल आणि चांगली कमाई करत असेल, तर तिच्या पगाराबद्दल लगेच विचारू नका.
ती तिच्या जुन्या नात्याबद्दल बोलतेय का याची वाट पाहा. तुमचं नातं नुकतंच सुरू झालं असेल आणि तुम्ही लगेच तिच्या ‘एक्स’बद्दल चौकशी करू लागलात, तर ती घाबरू शकते.
तुमच्या रिलेशनशिपमध्ये अजून सगळं नविन आहे. अशावेळी तिच्याकडून गिफ्ट्स मागणं, किंवा चेष्टा करत काही मिळवण्याचा प्रयत्न करणं हे नात्याला आर्थिक वळण देऊ शकतं.
नातं हळूहळू आणि विश्वासाने फुलतं. सुरुवातीलाच तिच्या अत्यंत खासगी स्पेसमध्ये घुसू नका. तिच्या भावना समजून घेण्यासाठी वेळ द्या.
नवीन नातं म्हणजे नाजूक फुलासारखं जपून सांभाळावं लागतं. गरज आहे फक्त संयम, समजूतदारी आणि सच्च्या भावनांची.