वाचन कला वाढवायची आहे? करा 'हे' सोपे उपाय...

Ganeshprasad Gogate

बसमध्ये, ट्रेनमध्ये आणि अगदी डॉक्टरांकडे जाताना एक पुस्तक सोबत ठेवाच. जेव्हा थोडा फावला मेळ मिळेल तेव्हा तो सत्कारणी लावता येईल.

The art of reading | Dainik Gomantak

वाचन हे दैनंदिन जीवनाचा भाग होणं आवश्यक असतं. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक ठरावीक वेळ वाचनासाठी ठेवा. दररोज प्रयत्न केले तर ही तुमची सवय होऊन जाईल.

The art of reading | Dainik Gomantak

पुस्तकांची यादी करा. ही एक चांगली सवय तुम्हाला पुस्तकांच्या अधिक जवळ नेईल. मोबाईलमध्ये किंवा कागदावर तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायची आहेत त्यांची यादी करा.

The art of reading | Dainik Gomantak

बुक क्लबचे सभासद झाल्यानं भरपूर फायदे होतात. समविचारी लोकांबरोबर मैत्री होते, नवीन पुस्तकांची माहिती होते. एकमेकांना आवडणाऱ्या पुस्तकांची चर्चा करता येते.

The art of reading | Dainik Gomantak

पुस्तक वाचायला सुरुवात केली म्हणून ते संपावं असा काही नियम नाही. बळजबरीनं वाचत असाल तर तुमचा वाचनातील रस निघून जाऊ शकतो.

The art of reading | Dainik Gomantak

एखादं काम निर्धारित वेळेत पूर्ण करताना भरपूर समस्या येतात, पण स्वतःपुढे एक वास्तववादी लक्ष्य ठेवा. एका पुस्तकासाठी ठरावीक मुदत द्या, त्यामुळं पुस्तक वाचण्यात चालढकल करणार नाही.

The art of reading | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak
मिरची आणि आहार