Rahul sadolikar
अभिनेता विवेक ओबेरॉयचा आज वाढदिवस, त्यानिमित्त पाहुया विवेकचं करिअर आणि त्याचा सलमानशी झालेला संघर्ष
विवेक ओबेरॉयचा जन्म 03 सप्टेंबर 1976 रोजी झाला. विवेक नेहमीच त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी अधिक चर्चेत असतो
विवेक प्रसिद्ध अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आहे. 'कंपनी' या पहिल्या चित्रपटासाठी विवेकला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार मिळाला.
सलमान खानच्या पझेसिव्ह वर्तनामुळे त्याचे आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर ऐश्वर्या आणि विवेक यांच्यात जवळीक वाढू लागली, जी सलमानला अजिबात आवडली नाही.
विवेकचे करिअर बिघडवण्याचे श्रेय सलमान खानला जाते, असे म्हटले जाते. ऐश्वर्यासोबतची त्याची वाढती जवळीक पाहून सलमानने त्यावेळी विवेकला फोन करून ऐश्वर्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
विवेक आता दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जास्त दिसतो. मात्र, त्याची कारकीर्द अद्याप पूर्णपणे रुळावर आलेली नाही. क्रिश 3, साथिया, ग्रँड मस्ती, दम, काल, बँक चोर, रोड, ओंकारा या सुपरहिट चित्रपटांमध्ये विवेकने काम केले आहे
चित्रपटांव्यतिरिक्त विवेकचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. त्यांची कन्स्ट्रक्शन्स कंपनीही आहे.