Shreya Dewalkar
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो अकाली वृद्धत्व येवू शकते..
पण वेळेआधीच त्वचेला सुरकुत्या दिसू लागली तर काय करायचं?
चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची अनेक कारणे असू शकतात, पण वेळेआधीच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या, तर त्यासाठी कुठेतरी जीवनसत्त्वांची कमतरता कारणीभूत आहे.
चेहरा वेळेआधी जुना दिसू लागला तर त्याचा त्याच्या सौंदर्यावर वाईट परिणाम होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी बाहेरील उत्पादनांपासून ते घरगुती उपायांचाही वापर केला जातो.
त्वचा तरूण आणि सुंदर ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए खूप आवश्यक आहे. व्हिटॅमिन ए च्या मदतीने त्वचेचा एक नवीन थर तयार होतो. शरीरात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.
व्हिटॅमिन सीच्या मदतीने त्वचा तरुण आणि सुंदर दिसते. शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास त्वचा जुनी दिसू लागते.
सूर्यापासून मिळणारे व्हिटॅमिन डी त्वचेसाठी खूप चांगले असते. त्वचेच्या सर्व प्रकारच्या समस्या कमी करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे.
चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी कोणते जीवनसत्त्वे जबाबदार आहेत