गोव्यातल्या 'या' घरात पुस्तकं राहतात...

गोमन्तक डिजिटल टीम

पुस्तकं आपल्याला समृद्ध करतात, पुस्तकवेडी अनेक लोकं आपण पाहिली आहेत.

पण, गोव्यात एक घर आहे जिथं फक्त माणसं नव्हे तर, पुस्तकं राहतात.

या घरात बोलकी दारं खिडक्या, सोफा, टेबल आणि झाडं, फुलं आहेत.

मुलांनी घरातील प्रत्येक बोलकी केली असून. प्रसन्न वातावरण जिंवत ठेवले आहे.

डिजिटलच्या युगात पुस्तकांपासून दूर पळणाऱ्या लहान मुलांसाठी पुस्तकाची गोडी लावणारा हा अभिनव उपक्रम आहे.

सुजता नरोन्हा यांनी सतरा वर्षांपूर्वी "बुकवर्म" (ज्याला मराठीत आपण पुस्तकी किडा असे म्हणून शकतो) या उपक्रमाची आपल्या घरातच मुहूर्तमेढ रोवली. आणि आज त्याचा वटवृक्ष झाला आहे.

लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी हे पुस्तकालय खुले आहे. मुलांना पुस्तकाची गोडी लावणे तसेच, त्यांचे वय, आवड यानुसार पुस्तकांची निवड करून तिथेच वाचण्याची सविधा उपलब्ध करून देणे. असे या पुस्तकालयाची संकल्पना आहे.

याशिवाय बुकवर्म शाळेत पुस्तकालय घेऊन जाणे, मोबाईल आऊटरीच प्रोग्राम, प्रोफेशनल प्रोग्राम राबवते.

बुकवर्मच्या वतीने प्रत्येक आठवड्याला 3-6 वयोगटातील मुलांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन केले जाते. याशिवाय अनेक उपक्रमांचा समावेश आहे.

बुकवर्म प्रामुख्याने लहान मुलांसाठी काम करत आहेत. यामध्ये पुस्तकांशिवाय विविध कलागुण जोपासणे, गप्पा गोष्टी आणि नानाविध कलाकुसर शिकवणे यांचा समावेश आहे.

याशिवाय प्रत्येक वयोगटासाठी देखील बुकवर्म विविध उपक्रम आणि सुविधा राबवत आहे. यामध्ये प्रत्येकाच्या आवडीनुसार पुस्तकांची सुचवली जातात. तसेच, दूरस्थ ग्रंथालय नावाचा उपक्रम देखील राबवला जातो.

बुकवर्म लहान मुलांसाठी अनेक मोफत उपक्रम राबवत असते. मुलांमध्ये पुस्तकांची आवड निर्माण करणे तसेच, विविध कलाकुस्कर याच्या माध्यमातून मुलांची सृजनशिलता वाढवण्याचा प्रयत्न बुकवर्म करत आहे.

बुकवर्मच्या विविध उपक्रमांबाबत mail@bookwormgoa.in किंवा 9823222665 या क्रमांकावर अधिक माहिती मिळेल.

Goa | Dainik Gomantak
क्लिक करा