Pranali Kodre
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 ते 16 जुलै दरम्यान डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे.
या सामन्यात पहिल्या डावात खेळताना विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने या सामन्यात खेळताना कसोटी कारकिर्दीत 8500 धावांचा टप्पा पार केला आहे.
त्यामुळे विराट कोहलीने कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तो या यादीत पाचव्या क्रमांकावर आला आहे.
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर अव्वल क्रमांकावर असून त्याने 200 कसोटीत 15921 धावा केल्या आहेत.
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 163 सामन्यांत 13265 धावा केल्या आहेत.
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सुनील गावसकर तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 125 सामन्यांत 10122 धावा केल्या आहेत.
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण चौथ्या क्रमांकावर असून त्याने 134 सामन्यांत 8781 धावा केल्या आहेत.