Pranali Kodre
आयपीएल 2023 मध्ये 20 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला गुजरात टायटन्सविरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 101 धावांची खेळी केली.
विराटचे हे आयपीएल 2023 मधील सलग दुसरे शतक ठरले आहे. त्याने यापूर्वी 18 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 63 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 100 धावांची खेळी केली होती.
विराटचे गुजरातविरुद्ध केलेले शतक आयपीएल कारकिर्दीतील सातवे शतक ठरले, त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेलला मागे टाकले आहे.
विराटने आयपीएलमध्ये 2016 साली 4 शतके, 2019 मध्ये 1 शतक आणि 2023 मध्ये 2 शतके केली आहेत.
ख्रिस गेलनेही त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 142 सामन्यात 6 शतके केली आहेत.
जॉस बटलरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 97 सामन्यांमध्ये 5 शतके केली आहेत.
केएल राहुलने आयपीएलमध्ये 118 सामन्यांमध्ये 4 शतके केली आहेत.
आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरने आत्तापर्यंत 176 सामन्यांमध्ये 4 शतके केली आहेत.
शेन वॉटसनने आयपीएलमध्ये त्याच्या कारकिर्दीत 145 सामन्यांमध्ये 4 शतके केली आहेत.