Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने चेन्नईमध्ये वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले.
भारताच्या या विजयात विराट कोहलीने क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी असे दोन्ही क्षेत्रात योगदान देत महत्त्वाचा वाटा उचलला.
या सामन्यात विराटने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 85 धावांची खेळी केली.
त्यामुळे विराट वनडे क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकून अव्वल क्रमांकावर आला आहे.
विराटने वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना 92 डावात 5517 धावा केल्या आहेत (आकडेवारी 8 ऑक्टोबर 2023 पर्यंत).
तसेच सचिन तेंडुलकरने वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना 124 डावात 5490 धावा केल्या आहेत.
या यादीत विराट आणि सचिन यांच्या पाठोपाठ रिकी पाँटिंग आहे. त्याने वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना 104 डावात 4186 धावा केल्या आहेत.
तसेच या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना 89 डावात 3983 धावा केल्या आहेत.