Pranali Kodre
आशिया चषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात 41 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात रोहित शर्माने 48 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.
या खेळीदरम्यान वनडेमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने 241 व्या वनडे डावात खेळताना हा कारनामा केला आहे.
त्यामुळे रोहित विराट कोहलीनंतर सर्वात जलद 10 हजार वनडे धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
विशेष म्हणजे आता सर्वात जलद 10 हजार वनडे धावा करणाऱ्या पहिल्या 4 फलंदाजांमध्ये भारतीय खेळाडूच आहेत.
अव्वल क्रमांकावर असलेल्या विराटने 205 वनडे डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
तसेच विराट आणि रोहित यांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून सचिन तेंडुलकर असून त्याने 259 वनडे डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
या यादीत चौथ्या क्रमांकावर सौरव गांगुली आहे. त्याने 263 वनडे डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.