विराटला 'त्या' मेसेजने सापडला धोनीमधील 'आपला माणूस'

Pranali Kodre

विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्यात चांगली मैत्री असल्याचे आता सर्वांनाच माहिती आहे.

MS Dhoni - Virat Kohli | Dainik Gomantak

धोनीने नेहमीच विराटला पाठिंबा दिला असून विराटनेही नेहमीच धोनीचा आदर राखला आहे.

MS Dhoni - Virat Kohli | Dainik Gomantak

नुकतेच विराटने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये धोनीबरोबरच्या नात्याबद्दल मोठे भाष्य करताना त्याला धोनीने त्याच्या वाईट काळात कशी साथ दिली याबद्दल सांगितले आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराटने सांगितले की बालपणीचे प्रशिक्षक आणि माझ्या कुटुंबाशिवाय फक्त एक व्यक्ती होता, ज्याने या काळात माझ्याशी संपर्क साधला, तो व्यक्ती म्हणजे एमएस धोनी.

MS Dhoni - Virat Kohli | Dainik Gomantak

विराटने सांगितले की 'धोनीला साधारण दिवशी फोन केला, तर तो ९९ टक्के उचलणार नाही. कारण तो फारसा फोन पाहात नाही. त्यामुळे तोच मला संपर्क करतो'

MS Dhoni - Virat Kohli | Dainik Gomantak

तसेच विराटने धोनीच्या मेसेजबद्दल सांगितले की, 'एकदा त्याने मेसेज केलेला की जेव्हा तुम्ही मजबूत असाल अशी सर्वांना अपेक्षा असते आणि दिसताना पण तुम्ही मजबूत दिसता, तेव्हा लोक तुम्हाला तुम्ही कसे आहात, हे विचारायला विसरतात.'

MS Dhoni - Virat Kohli | Dainik Gomantak

धोनीच्या या मेसेजनंतर विराटला खूप आपलेपणा वाटल्याचे त्यानेच मान्य केले.

MS Dhoni - Virat Kohli | Dainik Gomantak

त्याचबरोबर विराटने असेही सांगितले की धोनीनेच त्याला कर्णधारपदासाठी निवडले होते. तसेच जेव्हा नेतृत्वबदल झाला, तेव्हा त्यांच्या नात्यात कधीही फरक पडला नाही.

MS Dhoni - Virat Kohli | Dainik Gomantak

विराटने तो धोनीचा खूप सन्मान करत असल्याचेही सांगितले.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराट आणि धोनी भारतीय संघाकडून ११ वर्षे एकत्र खेळले आहेत.

MS Dhoni - Virat Kohli | Dainik Gomantak
Harry Brook | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी