Pranali Kodre
5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकपचे 13 वे पर्व भारतात सुरु होणार आहे.
या वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताचा 15 जणांचा संघही सज्ज आहे.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात 2 खेळाडू असे आहेत जे 2011 साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये खेळले आहेत.
हे दोन खेळाडू म्हणजे विराट कोहली आणि आर अश्विन.
वर्ल्डकप 2011 स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाचा हे 2 खेळाडू भाग होते.
दरम्यान, वर्ल्डकप 2011च्या अंतिम सामन्यात भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये विराट खेळाला होता, पण अश्विनला संधी मिळाली नव्हती.
अश्विन वर्ल्डकप 2011 स्पर्धेत 2 सामने खेळाला होता, ज्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच विराट या स्पर्धेत 9 सामन्यात एका शतकासह 282 धावा केल्या होत्या.
विराट आणि अश्विन यांच्यासाठी 2011 चा कारकिर्दीतील पहिलाच वर्ल्डकप होता. त्यानंतर विराटने भारताकडून 2015 आणि 2019 वर्ल्डकप खेळला, तर अश्विनने 2015 चा वर्ल्डकप खेळला. आता हे दोघेही पुन्हा एकत्र वर्ल्डकप खेळण्यास सज्ज आहेत.