Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 8 ऑक्टोबर रोजी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला.
भारताच्या या विजयात विराट कोहलीने क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी असे दोन्ही क्षेत्रात योगदान देत महत्त्वाचा वाटा उचलला.
या सामन्यात विराटने 85 धावांची खेळी केली आणि क्षेत्ररक्षण करताना मिचेल मार्श आणि ऍडम झम्पा यांचे दोन झेल देखील घेतले होते.
त्यामुळे विराट वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय क्षेत्ररक्षक (यष्टीरक्षक नसलेला) ठरला आहे.
विराटने वनडे वर्ल्डकपमध्ये 27 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना 16 झेल घेतले आहेत.
विराटने वनडे वर्ल्डकपमध्ये 16 झेल घेत अनिल कुंबळेचा विक्रम मागे टाकला आहे.
अनिल कुंबळेने वनडे वर्ल्डकपमध्ये 18 डावात 14 झेल घेतले आहेत.
तसेच कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांनी वनडे वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी 12 झेल घेतले आहेत.