सुपरफास्ट विराट! 13 हजार वनडे धावा करत सचिनला पछाडलं

Pranali Kodre

भारताचा विजय

भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर कपच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 11 सप्टेंबर रोजी 228 धावांनी विजय मिळवला.

Virat Kohli - KL Rahul | Twitter

विराटची शतकी खेळी

या सामन्यात विराटने 94 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 122 धावांची नाबाद खेळी केली.

Virat Kohli | Twitter

रनमशीन

या शतकी खेळी दरम्यान विराट कोहलीने 13 हजार वनडे धावाही पूर्ण केल्या आहेत. तो 13 हजार धावा करणारा जगातील 5 वा खेळाडू ठरला आहे.

Virat Kohli | Twitter

13 हजारी मनसबदार

विराटपूर्वी सचिन तेंडुलकर (18426), कुमार संगकारा (14234), रिकी पाँटिंग (13704) आणि सनथ जयसूर्या (13430) यांनी वनडेत 13 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

Sachin Tendulkar | Twitter/ICC

विराटचा विश्वविक्रम

मात्र, विराटने इतर चौघांपेक्षाही सर्वात जलद 13 हजार वनडे धावा करण्याचा पराक्रम केला आहे. विराटने 267 व्या वनडे डावात खेळताना हा टप्पा ओलांडला.

Virat Kohli | Twitter

सचिनला टाकलं मागे

यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वात जलद 13 हजार वनडे धावा करण्याचा विक्रम होता. सचिनने 321 डावात 13 हजार वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.

Sachin Tendulkar | Twitter/ICC

दिग्गज

तसेच विराट, सचिनच्या पाठोपाठ सर्वात जलद 13 हजार वनडे धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिकी पाँटिंग (341 डाव), कुमार संगकारा (363 डाव) आणि सनथ जयसूर्या (416 डाव) हे फलंदाज आहेत.

Virat Kohli | Twitter

सुपरफास्ट विराट

महत्त्वाचे म्हणजे विराट वनडेमध्ये सर्वात जलद 8 हजार, 9 हजार, 10 हजार, 11 हजार, 12 हजार आणि 13 हजार धावांचा टप्पा पार करणारा खेळाडू आहे.

Virat Kohli | Twitter
Rohit Sharma | Dainik Gomantak