Virat Kohli 'असा' विक्रम करणारा पाँटिंग, तेंडूलकरनंतर तिसराच

Pranali Kodre

विराट कोहलीने नुकतेच बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळली.

Virat Kohli | Dainik Gomantak

या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 असा विजय मिळवला.

Team India | Dainik Gomantak

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान विराटने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयी सामन्यांमध्ये 16 हजार धावा करण्याचा टप्पा पार केला आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयी सामन्यांमध्ये 16 हजार धावांचा टप्पा आत्तापर्यंत विराटशिवाय केवळ रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडूलकरनेच पार केला आहे.

Ricky Ponting | Dainik Gomantak

विराटने विजय मिळवलेल्या सामन्यांमध्ये आत्तापर्यंत 16002 धावा केल्या आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak

त्यामुळे विराट आता विजयी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाँटिंग आणि तेंडूलकर पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

रिकी पाँटिंग या यादीत 20140 धावांसह अव्वल क्रमांकावर आहे.

Ricky Ponting | Dainik Gomantak

सचिन तेंडुलकर 17113 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Sachin Tendulkar | Dainik Gomantak
Vitamin C | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी येथे क्लिक करा