Pranali Kodre
आयपीएल 2023 स्पर्धेत 20 एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामना झाला.
या सामन्यादरम्यान विराट कोहलीने 59 धावा करताना 5 चौकार आणि 1 षटकार मारला.
त्यामुळे विराटने आयपीएल कारकिर्दीत 600 चौकार मारण्याचा टप्पा पूर्ण केला.
विराट आयपीएलमध्ये 600 चौकार मारणारा तिसरा क्रिकेटपटू आहे.
विराटपूर्वी शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी असा कारनामा केला आहे.
शिखरने 210 आयपीएल सामन्यांमध्ये 730 चौकार मारले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे आयपीएलमध्ये 700 हून अधिक चौकार मारणारा सध्या तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने 168 आयपीएल सामन्यांमध्ये 619 चौकार मारले आहेत.