Pranali Kodre
आयपीएल 2023 स्पर्धेत 6 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना झाला.
या सामन्यात खेळतना बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 55 धावांची अर्धशतकी खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
त्याने या खेळीदरम्यान आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या आहेत.
विराट आयपीएलमध्ये 7000 धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा कोणालाही करता आलेला नाही.
विराटच्या आता आयपीएलमध्ये 233 सामन्यांमध्ये 7043 धावा झाल्या आहेत.
विराटने आयपीएलमध्ये 6 मे पर्यंत 50 अर्धशतके आणि 5 शतकेही केली आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटूंच्या यादीत विराटच्या पाठोपाठ शिखर धवन आहे.
शिखरने 6 मे पर्यंत 213 सामन्यांमध्ये 6536 धावा केल्या आहेत.