विराट 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर

Pranali Kodre

दुसरा कसोटी सामना

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 20 जुलैपासून त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरु आहे.

India vs West Indies | Twitter

विराटचं अर्धशतक

या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर विराट कोहलीने नाबाद 87 धावा केल्या, यासह त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Virat Kohli | Twitter

500 वा सामना

हा सामना विराटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 500 वा सामना आहे.

Virat Kohli | Twitter

जगातील 10 वा खेळाडू

विराट 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील 10 आणि भारताचा चौथा क्रिकेटपटू ठरला.

Virat Kohli | Twitter

विराट विक्रम

विराटने त्याचा 500 व्या सामन्यात 50 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे विराट 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

Virat Kohli | Twitter

कोणालाच यापूर्वी जमलं नाही

विराटआधी 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा पराक्रम करणाऱ्या 9 क्रिकेटपटूंना त्यांच्या 500 व्या सामन्यात अर्धशतक करता आले नव्हते.

Virat Kohli | Twitter

25500 धावा

तसेच विराटने या खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 25500 धावांचा टप्पा पार केला.

Virat Kohli | Twiiter

पाचवा क्रमांक

याबरोबरच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचवा क्रमांकही मिळवला.

Virat Kohli | Twitter
Yashasvi Jaiswal - Rohit Sharma | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी