Pranali Kodre
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीमध्ये झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
या सामन्यादरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा पूर्ण केल्या.
विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा करणारा जगातील सहावा खेळाडू ठरला आहे.
तसेच विराटने 549 व्या आंतरराष्ट्रीय डावात 25 हजार धावा धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 25 हजार धावा करणारा खेळाडूही ठरला.
त्याने या यादीत भारताच्याच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने 577 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 25 हजार धावांचा टप्पा पार केला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सध्या 34357 धावांसह सचिन तेंडुलकर अव्वल क्रमांकावर आहे.
त्यापाठोपाठ कुमार संगकारा असून त्याने 28016 धावा केल्या आहेत.
रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 27483 धावा केल्या आहेत.
चौथ्या क्रमांकावर माहेला जयवर्धने आहे. त्याने 25957 धावा केल्या आहेत.
जॅक कॅलिस पाचव्या क्रमांकावर असून त्याने 25534 धावा केल्या आहेत.
विराट सध्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर असून त्याने 549 डावात 53.55 च्या सरासरीने 25012 धावा केल्या आहेत.