Akshata Chhatre
जी. एल. बत्रा कधीही विसरू शकणार नाहीत त्या जून महिन्यातल्या सकाळच्या फोन कॉलला.
विक्रमचा आवाज सॅटेलाइट फोनवरून ऐकू येत होता, पण तो खूप वेगाने बोलत होता आणि स्पष्ट ऐकू येत नव्हतं. असं कॅप्टन बत्रा यांचे वडील सांगतात.
एक क्षणासाठी त्यांना वाटलं की त्यांचा मुलगा पकडला गेला आहे. तरीही भीतीने त्यांनी विक्रमला स्पष्ट बोलायला सांगितलं. ‘ओह डॅडी, मी शत्रूचा पोस्ट काबीज केला आहे. मी ठिक आहे, मी ठिक आहे.’
‘बेटे, मला तुझा अभिमान आहे,’ बत्रा साहेब म्हणाले, ‘देव तुझ्या कार्यात यश देऊ दे.’
तो दिवस होता २० जून १९९९. मागच्या रात्री विक्रमने एका धाडसी मोहिमेचं नेतृत्व केलं होतं आणि वडिलांना त्याच्या पराक्रमाचा मोठा अभिमान वाटत होता.
नऊ दिवसांनी, विक्रमने पुन्हा बेस कॅम्पमधून फोन केला. तो आणखी एका महत्वाच्या मोहिमेसाठी निघत होता.
पण त्यानंतर त्याचा फोन कधीच आला नाही.