Pranali Kodre
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 15 ऑगस्ट हा भारतभरात स्वातंत्र्यदिवस म्हणून साजरा केला जातो.
याच दिवशी भारताकडून क्रिकेट खेळलेल्या विजय भारद्वाज आणि हेमलता काला या दोन खेळाडूंचा वाढदिवसही आहे. विशेष म्हणजे दोघांचेही जन्मसाल 1975 आहे.
बंगळुरू येथे जन्म झालेले विजय भारद्वाज हे अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत, जे उजव्या हाताने फलंदाजी करायचे आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी करायचे.
विजय भारद्वाज यांनी 1999 ते 2002 दरम्यान भारताकडून 3 कसोटी आणि 10 वनडे सामने खेळले. निवृत्तीनंतर ते प्रशिक्षण क्षेत्राकडे वळाले.
हेमलता काला यांचा जन्म 15 ऑगस्ट 1975 साली आग्रा, उत्तर प्रदेश यथे झाला.
त्यांनी 1999 ते 2008 दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले.
हेमलता यांनी भारतीय महिला संघाकडून 7 कसोटी, 78 वनडे आणि 1 टी२० सामने खेळले.