Kavya Powar
मागील महिन्याभरापासून गोव्यात भाजीपाल्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गृहिणींचे बजेट कोलमडले असून, स्थानिक भाज्यांना मागणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
कांदा, टोमॅटो, पालेभाज्या, लसूण तसेच आल्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
लसुणाचा आकार आणि गुणवत्ता याप्रमाणे बाजारात ३२० ते ३५० रू प्रती किलो दराने विक्री केली जात होती.
आले देखील १५० ते १७० रूपये प्रती किलो दराने विकले जात आहे.
कांदा तसेच टॉमेटो ६० रूपये किलो दराने विकला जातोय.
सर्वसामान्यांना भाजीपाला घेणे परवडत नसून मध्यमवर्गीयांचे महिन्याचे बजेट कोलमडत आहे.
राज्यात शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला बाजारात विक्रीला येत असल्याने अनेक नागरिक ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांद्वारे भाजीपाला घेण्याकडे अधिक कल असतो.