Manish Jadhav
वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपताना डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला असावेत, हे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. या स्थितीमुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा आणि रक्तप्रवाह सुधारुन गाढ झोप लागण्यास मदत होते.
जर तुमचे डोके पूर्व दिशेला आणि पाय पश्चिम दिशेला असतील, तर यामुळे स्मरणशक्ती, बौद्धिक क्षमता आणि एकाग्रतेमध्ये वाढ होते. विद्यार्थी आणि ज्ञानार्जनाशी जोडलेल्या व्यक्तींसाठी ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते.
पश्चिम दिशेला डोके करुन झोपल्याने व्यक्तीला भौतिक सुख-सुविधा आणि मानसिक शांतता लाभू शकते. काही ग्रंथांनुसार प्रवासात किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये ही दिशा फायदेशीर ठरु शकते.
वास्तुशास्त्रानुसार कधीही उत्तर दिशेला डोके आणि दक्षिण दिशेला पाय करुन झोपू नये. या दिशेकडे डोके केल्याने शरीराच्या चुंबकीय लहरींवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे रात्री झोपेत अस्वस्थता आणि भयानक स्वप्ने पडू शकतात.
दक्षिण दिशेला डोके करुन झोपल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि शरीरातील ऊर्जा टिकून राहून आरोग्य निरोगी राहते.
झोपण्याची दिशा योग्य असल्यामुळे घरामध्ये आणि शरीराभोवती सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो, ज्यामुळे नैराश्य आणि नकारात्मक विचार दूर राहतात.
जर तुम्ही वास्तुच्या नियमांनुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके करुन झोपलात, तर सकाळी उठल्यानंतर शरीरात एक वेगळाच उत्साह आणि ताजेतवानेपणा जाणवतो.