Kavya Powar
वडापाव आवडत नाही असा एखादाच कुणीतरी असेल.
स्ट्रीट फूड मध्ये वडापाव प्रथमस्थानी असतो. आजचा दिवस वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो
पहिला वडा पाव स्टॉल 1966 मध्ये अशोक वैद्य यांनी दादर रेल्वे स्टेशन मुंबई येथे उघडला होता.
मुंबईतील या प्रसिद्ध स्ट्रीट फूडच्या स्मरणार्थ 23 ऑगस्ट हा जागतिक वडा पाव दिवस म्हणून साजरा केला जातो
बर्गरचा हा भारतीय प्रकार ताज्या पाव आणि बटाटा वड्याने बनवला जातो.
सुरुवातीला याची किंमत 5 रुपये होती. त्यामुळे तो सर्वांच्या खिशाला परवडणारा आवडता पदार्थ आहे
कालांतराने याच्या किमतीत बदल झाला असून यामध्ये वैविध्य दिसून आले.