Kavya Powar
utterly butterly delicious! असं म्हणत घराघरात पोहोचलेल्या अमूल गर्लला आपण सर्वजण ओळखतो
पण तुम्हाला तिच्याबद्दलच्या या इंट्रेस्टिंग गोष्टी माहिती आहेत का?
1966 मध्ये अमूल ब्रॅंडतर्फे राबविण्यात आलेल्या जाहिरात मोहिमेत या अमूल गर्लला जगासमोर आणण्यात आले.
Sylvester daCunha यांनी जाहिरातीमार्फत आपल्या घराघरात पोहोचलेल्या अमूल गर्लचे डिझाईन केले होते
तिच्या डिझाईनमागील कल्पना ही Sylvester यांची बायको Nisha यांची होती.
त्यांच्या कल्पनेतून पोलका डॉट असलेला फ्रॉक आणि पोनी घातलेली अमूल गर्ल आपण वर्षानुवर्षे पाहत आलोय
अमूल गर्ल ही जाहिरात भारतातील सर्वात जास्त कालावधीपर्यंत चाललेली जाहिरात मोहीम म्हणून ओळखली जाते
दरम्यान, काही दिवसांपूर्वी Sylvester daCunha यांचे निधन झाले
भारतीय प्रतिमेची अमूल गर्ल प्रत्येकाच्या मनावर कोरणारे जनक Sylvester यांनी त्यांच्या ऐंशीत जगाचा निरोप घेतला
Sylvester daCunha यांचे निधन झाल्यावर अमूलतर्फे 'अमूल गर्ल रडतीये' असा भावनिक फोटो शेयर करण्यात आला आहे.