Pranali Kodre
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मोठा चाहतावर्ग आहे.
एमएस धोनी भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारही समजला जातो.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळताना 44.96 च्या सरासरीने 17266 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 16 शतकांचा आणि 108 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने यष्टीमागे 829 विकेट्स घेतल्या आहेत.
धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण असे असले तरी आयपीएलमधये मात्र तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसतो.
धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 या हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.