इजिप्तबद्दलच्या 'या' खास गोष्टी माहित आहेत का?

Ashutosh Masgaunde

स्वातंत्र्य

28 फेब्रुवारी 1922 रोजी इजिप्तची ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटका झाली, ज्यांना 1882 मध्ये गुलाम बनवले होते. इजिप्तने 18 जून 1953 रोजी स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.

Egypt | Dainik Gomantak

क्षेत्रफळ

इजिप्त हा 3,90,121 चौरस मैलांमध्ये पसरलेला देश आहे, जो क्षेत्रफळानुसार जगातील 30 वा सर्वात मोठा देश आहे. आणि त्याची एकूण लोकसंख्या 100 दशलक्षांपेक्षा जास्त आहे, त्यानुसार तो लोकसंख्येच्या बाबतीत जगात 15 व्या क्रमांकावर आहे.

Egypt | Dainik Gomantak

राजधानी

कैरो ही इजिप्तची राजधानी आणि त्या देशातले तसेच आफ्रिकी खंडातले सगळ्यात मोठे शहर आहे. नाइल नदीच्या खोऱ्याजवळ असलेले हे शहर इ.स. ९६९ मध्ये वसवले गेले.

Egypt | Dainik Gomantak

अधिकृत नाव व भाषा

इजिप्तचे अधिकृत नाव इजिप्तचे अरब प्रजासत्ताक आहे. इजिप्तची अधिकृत भाषा अरबी आहे. याशिवाय येथील लोक इंग्रजी आणि फ्रेंच भाषाही बोलतात.

Egypt | Dainik Gomantak

मांजराला महत्त्व

प्राचीन इजिप्शियन लोक मांजरांचा इतका आदर करत होते की मांजराला मारणाऱ्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा दिली जात असे. मांजराच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी त्यांच्या भुवया कापायचे.

Egypt | Dainik Gomantak

'गिझा पिरॅमिड'

इजिप्तचा सर्वात प्रसिद्ध पिरॅमिड 'गिझा पिरॅमिड' बांधकामानंतर 3871 वर्षांपर्यंत जगातील सर्वात उंच इमारत होती. गिझाचा ग्रेट पिरॅमिड तयार करण्यासाठी सुमारे तीस लाख मजुरांनी 23 वर्षे काम केले.

Egypt | Dainik Gomantak

श्रृंगार

इजिप्तमध्ये श्रृंगार करणे अनिवार्य आहे. त्यांचा असा विश्वास होता की हिरवा आणि काळा सूरमा सूर्यकिरण, माश्या आणि हानिकारक संसर्गापासून त्यांचे संरक्षण करतात.

Egypt | Dainik Gomantak