Akshata Chhatre
राखी पौर्णिमा म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला उत्सव, जो यंदा 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा होणार आहे.
या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधते, तर भाऊ तिला एखादी खास भेट देऊन तिच्या प्रेमाचा सन्मान करतो.
पण अनेक भावांना हा प्रश्न सतावतो की नेमकी कोणती भेट दिल्यास बहिणीला आनंद होईल?
बहिणीच्या सौंदर्यसाजिरीसाठी हेअर ड्रायर, कर्लर किंवा स्ट्रेटनर दिल्यास तिला नक्कीच आवडेल.
फॅशनेबल चंक ज्वेलरी, घड्याळ किंवा बॉडी स्क्रब-शॉवर जेल कॉम्बो देखील चांगले पर्याय ठरू शकतात.
गॅजेट्समध्ये इअरबड्स, हेडफोन्स, स्मार्ट घड्याळ, स्टायलिश फोन किंवा लॅपटॉप कव्हर बहिणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
कपडे, बूट, पाकीट किंवा बॅगसारख्या वस्तूही आवडत्या असतात. कॉफी प्रेमी बहिणीसाठी कॉफी मेकर किंवा इलेक्ट्रिक व्हिस्कर एक अनोखी भेट ठरू शकते.