Puja Bonkile
केंद्रीय गृहमंत्री अमित अनिल चंद्र शाह हे आपल्या निर्णय क्षमेतमुळे देशभरात ओळखले जातात.
ते बायो-केमिस्ट्रीमध्ये पदवीधर आहेत. याआधी त्यांनी स्टॉक ब्रोकरचे काम देखील केले आहे.
मेहसाणा येथील शाळेतून अमित शाह यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले.
अमित शाह यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले.
यासोबतच त्यांनी अहमदाबादमधील स्टॉक ब्रोकर आणि सहकारी बँकांमध्येही काम केले.
ते स्टॉक मार्केट विषयातही पारंगत आहेत. आजही त्यांनी विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करुन ठेवली आहे.
२०१९ मध्ये मोदी सरकार सत्तेत अमित शाह यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री पदाचा कार्यभाग देण्यात आला.
अमित शाह लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत.
अहमदाबादमध्ये कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच ते औपचारिकपणे आरएसएस स्वयंसेवक बनले.