Kavya Powar
उत्तर गोव्यातील अनेक ठिकाणे आता पर्यटकांची आवडती ठिकाणे बनली आहेत.
त्यामुळे गोव्यात येणारे पर्यटक प्रामुख्याने उत्तर गोव्यातील बागा, कळंगुट याच किनाऱ्यांवर गर्दी करत असतात.
पण याव्यतिरिक्त दक्षिण गोव्यात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे अजूनही पर्यटकांची वर्दळ कमीच आहे. पुढच्या वेळी गोव्यात आल्यावर या ठिकाणांना जरूर भेट द्या
रिवण लेणींमध्ये 6व्या आणि 7व्या शतकात बौद्ध भिक्खूंचे वास्तव्य होते असे मानले जाते. इथे पर्यटकांची गर्दी नसल्यामुळे ही अतिशय शांत जागा आहे
बेतुल बीच हा दक्षिण गोव्यातील मोबोर बीचच्या शेजारील एक शांत समुद्रकिनारा आहे.
कोला बीच हा दक्षिण गोव्यातील Unexplored बीच आहे. इथे कयाकिंग केले जाते
211 चौरस किलोमीटर संरक्षित भूभागावर पसरलेला, नेत्रावळी धबधबा हा गोव्यातील सर्वात मोहक धबधब्यांपैकी एक आहे.
थ्री किंग्स चर्च हे गोव्यातील एक Haunted ठिकाण मानले जाते. ते त्याच्या रहस्यमय वातावरणासाठी ओळखले जाते.