Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये दरवर्षी भारतातील विविध भागातील खेळाडू खळताना दिसतात. या स्पर्धेत यापूर्वी गोव्याचेही काही खेळाडू खेळले आहेत.
दरम्यान, आयपीएल 2023 मध्येही गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारे दोन खेळाडू खेळताना दिसत आहेत.
हे दोन खेळाडू म्हणजे सुयश प्रभुदेसाई आणि अर्जुन तेंडुलकर.
सुयशला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आणि अर्जुनला मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 30 लाखांच्या किमतीत संघात समील करून घेतले आहे.
हे दोघेही या हंगामात आपापल्या संघाकडून काही सामनेही खेळले आहेत.
सुयश 2017 पासून गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
तसेच अर्जुनने 2022-23 हंगामातून गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
त्यामुळे सुयश आणि अर्जुन दोघे 2022-23 देशांतर्गत क्रिकेट हंगामात एकत्र खेळले देखील आहेत.
सुयश आणि अर्जुन यांच्यापूर्वी स्वप्नील अस्नोडकर आणि शादाब जकाती असे काही गोव्याचे खेळाडूही आयपीएलमध्ये खेळले आहेत.