टीव्हीची टीआरपी क्वीन ते बॉलीवुड; Mouni Roy चा लक्षवेधी प्रवास...

गोमन्तक डिजिटल टीम

मौनीचा जन्म 28 सप्टेंबर 1985 रोजी बिहार येथे झाला. मौनीची आई मुक्ती रॉय आणि आजोबा शेखर रॉय हेदेखील लोकप्रिय स्टेज कलाकार आहेत. त्यामुळे अभिनयाचा वारसा तिला घरातूनच मिळालेल आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मान्या, मॉन अशा टोपण नावांनी मौनी ओळखली जाते. मौनीने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून मास कम्यूनिकेशनला अॅडमिशन घेतले, पण ते तिला पुर्ण करता आले नाही.

Mouni Roy | Dainik Gomantak

2007 मध्ये एकता कपुरच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेमुळे मौनीला घराघरात ओळख मिळाली. ‘श्श्श..फिर कोई है’, ‘देवों के देव महादेव’ या मालिकांमुळेही तिच्या लोकप्रियतेत भर पडली.

Mouni Roy | Dainik Gomantak

एकता कपुरच्या ‘नागिन 1’, ‘नागिन 2’, ‘नागिन 3’ च्या यशानंतर मौनी टीव्हीवरील सर्वात महागडी अभिनेत्री बनली होती. त्यानंतर ‘झलक दिखला जा 7’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली.

Mouni Roy | Dainik Gomantak

अक्षयकुमारच्या 'गोल्ड' या चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. ‘केजीएफ: चैप्टर 1’मधील आयटम साँग, ‘रोमियो अकबर वॉल्टर’, ‘मेड इन चाइना’ 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून तिने काम केले आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीची एकुण संपत्ती 45-50 कोटी रूपये आहे. मौनीचे मुंबईत दोन अपार्टमेंटस आहेत. तिच्याकडे दीड कोटी रूपयांची मर्सिडिज जीएलएस 350 D आणि 67 लाख रूपयांची मर्सिडिज बेंज ई क्लास या गाड्या आहेत.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या हॉट आणि रॉयल लुकचे सगळेच फॅन आहेत. स्टायलिश आणि लग्झरियस लाईफस्टाईल ती जगते. मौनीने उद्योगपती सुरज नांबियारशी लग्न केले आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा