गोमंतक ऑनलाईन टीम
टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशीने आत्तापर्यंत तिच्या पर्सनल गोष्टी कुणाला सांगितल्या नव्हत्या.
फैजल शेखला दिलेल्या एका इंटरव्ह्युमध्ये तिने तिच्या लव्ह लाईफबद्दल काही गोष्टी उघड केल्या आहेत.
शिवांगीला तिच्या लग्नाविषयी विचारले असता तिने येत्या तीन ते चार वर्षात लग्न करणार असल्याचे सांगितले.
क्रशच नाही तर मला प्रेमही होऊ शकते. असेही ती म्हणाली.
शिवांगीला टीव्ही इंडस्ट्रीची प्रिन्सेस म्हटले जाते. त्यावरून तिला विचारले असता ती म्हणाली की, वास्तव आयुष्यात मात्र मी एका व्यक्तीची प्रिन्सेस आहे.
माझी आई मला प्रिन्सेस किंवा डॉल म्हणून बोलावते. पण आणखीही एक जण आहे, जी व्यक्ती मला या नावाने बोलवते. पण ती व्यक्ती कोण हे तिने सांगितले नाही.
सध्या शिवांगी ही बरसाते - मौसम प्यार का या सिरीयलमध्ये काम करत आहे. यात तिची कुशल टंडनसोबतची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे.