Akshay Nirmale
टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा तिवारी पती जसकरण सिंग गांधी याच्यासहीत गोव्यात व्हेकेशनसाठी आली होती.
रिद्धिमाला इन्स्टाग्रामवर 8 लाख 41 हजार फॉलोअर्स आहेत.
रिद्धिमाने नुकतेच एका आठवड्यापूर्वी शो पूर्ण केला होता. त्यानंतर ती गोव्यात दाखल झाली होती.
पुढील प्रोजेक्टवर काम सुरू करण्यापूर्वी तिला आराम हवा होता. रिद्धीमाला गोव्याचे वातावरण आवडते. त्यामुळे ती गोव्यात आली.
गोव्यावरील पोर्तुगीज प्रभाव, वालुकामय किनारे, जंगले, स्मारके, मिश्र संस्कृती आणि तोंडाला पाणी आणणारे भोजन यामुळे रिद्धिमाला गोवा खूप आवडतो, असे ती सांगते.
अॅनिव्हर्सरीपुर्वी आम्हाला डेटिंगचे दिवस जगायचे होते, त्यासाठी हे व्हेकेशन गरजेचे होते, असे रिद्धिमाने म्हटले आहे.
गोवा माझ्यासाठी लकी आहे. दरवेळी गोव्यात आल्यावर तेव्हा एक नवा प्रोजेक्ट हातात येतो. आता नीरज पांडेसोबत प्रोजेक्ट मिळाला आणि स्वप्न पूर्ण झाले.