कडाक्याच्या थंडीत तुळस सुकतेय? वाचवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Akshata Chhatre

थंडीपासून संरक्षण

रात्रीच्या वेळी पडणारे दव तुळशीसाठी घातक असते. तिला वाचवण्यासाठी सुती लाल कापडाने किंवा छिद्रे असलेल्या प्लास्टिकने झाकून ठेवा.

tulsi plant care in winter | Dainik Gomantak

पाण्याचे योग्य नियोजन

हिवाळ्यात रोज पाणी घालू नका. माती १-२ इंच सुकलेली असेल तरच पाणी द्या. शक्य असल्यास हलके कोमट पाणी वापरा, ज्यामुळे मुळांना उब मिळेल.

tulsi plant care in winter | Dainik Gomantak

मंजिरी काढणे आवश्यक

तुळशीवर मंजिरी आल्यास झाड आपली सर्व ऊर्जा बिया तयार करण्यासाठी वापरते. फांद्या सुकू नयेत म्हणून वेळोवेळी मंजिरी छाटून टाका.

tulsi plant care in winter | Dainik Gomantak

नैसर्गिक खत

आठवड्यातून एकदा एका ग्लास पाण्यात दोन चमचे कच्चे दूध मिसळून मुळांना द्या. यामुळे झाडाला अंतर्गत ताकद मिळते.

tulsi plant care in winter | Dainik Gomantak

हळदीचा वापर

फंगस आणि कीडांपासून वाचवण्यासाठी मातीवर आणि पानांवर थोडी हळद शिंपडा. हळद हे उत्तम नैसर्गिक अँटी-सेप्टिक आहे.

tulsi plant care in winter | Dainik Gomantak

वातावरणात उब

जर तुळस बाहेर जमिनीत असेल, तर संध्याकाळी तिच्या जवळ एक दिवा किंवा अगरबत्ती लावा. यामुळे निर्माण होणारी उब झाडाला मरण्यापासून वाचवते.

tulsi plant care in winter | Dainik Gomantak

मातीची मशागत

महिन्यातून दोनदा हलकी गुळणी (खुरपणी) करा, जेणेकरून मुळांना ऑक्सिजन मिळेल. खत म्हणून फक्त शेणखत किंवा वर्मीकम्पोस्ट वापरा.

tulsi plant care in winter | Dainik Gomantak

खोबरेल, बदाम की भृंगराज? कोणत्या समस्येसाठी कोणतं तेल आहे सर्वात 'बेस्ट'?

आणखीन बघा